Diabetes: फणस खाल्ल्याने शुगर वाढते का? डॉक्टरांच्या उत्तराने गैरसमज होईल दूर

Sakshi Sunil Jadhav

फणसाच्या समस्या

फणस हे सर्वांच्या आवडीचे खाल्ले जाणारे फळ आहे. त्यामध्ये खूप प्रमाणात पोषक घटक असतात. पण डायबेटीज असलेल्या रुग्णांनी फणस किती प्रमाणात खावा, कच्चा फणस जास्त फायदेशीर आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

does jackfruit increase blood sugar

फणसातली पोषक तत्वे

फणसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

does jackfruit increase blood sugar

पोषक तत्वांचे प्रमाण

फणसाच्या गरामध्ये अंडाजे २ टक्के प्रथिने, १ टक्का फॅट, ७४ टक्के पाणी आणि २३ टक्के कार्बोहायड्रेट्स असतात.

does jackfruit increase blood sugar

डायबेटीसचे रुग्ण

कच्च्या फणसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो डायबेटीजच्या रुग्णांसाठी चांगला ऑप्शन मानला जातो. त्यापासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.

ripe jackfruit for diabetics

पिकलेला फणस किती खावा?

डायबेटीजच्या रुग्णांनी पिकलेला फणस कमी प्रमाणातच खावा. साधारण १०० ते १२० ग्रॅम फणस खाल्ल्याने रक्तातली साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी असते.

raw jackfruit benefits

कच्च्या फणसाचे अनेक पदार्थ

कच्च्या फणसापासून भाजी, सूप, बिर्याणी, फ्राईड राईस, करी तसेच इतर चविष्ट पदार्थ बनवता येतात. तो मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणूनही वापरला जातो.

raw jackfruit benefits

ब्लड प्रेशरच्या समस्या

फणसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. पणऔषधांचा पर्याय म्हणून त्याकडे पाहू नका.

healthy eating tips

किडनीचे रुग्ण

फणसातले पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय फणस खाऊ नये.

healthy eating tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

healthy eating tips

NEXT : घरच्या घरी बनवा झणझणीत कुरकुरीत चणा कोळीवाडा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Chana Koliwada Recipe | meta ai
येथे क्लिक करा