Face shaving for women: महिलांनी चेहऱ्यावरचे केस शेव्ह करणं योग्य आहे?

Surabhi Jayashree Jagdish

शेव्हिंगमुळे केस जाड होत नाहीत

चेहऱ्यावरील केस शेव्ह केल्याने ते जाड, दाट किंवा अधिक वेगाने वाढतात हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शेव्हिंगमुळे फक्त त्वचेच्या पृष्ठभागावरील केस कापले जातात, केसांच्या मुळांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

Face shaving myths | saam tv

फेस शेव्हिंग बहुतेक महिलांसाठी सुरक्षित

स्वच्छ आणि धारदार रेझरचा वापर करून योग्य पद्धतीने फेस शेव्हिंग केल्यास ते सुरक्षित मानलं जातं. शेव्हिंग करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणं आणि स्वच्छ रेझर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य काळजी घेतल्यास त्वचेवरील संसर्ग आणि इरिटेशनचा धोका कमी होतो.

Does shaving make hair thicker | saam tv

फेस शेव्हिंगचे फायदे

फेस शेव्हिंगमुळे चेहऱ्यावरील बारीक केस त्वरित दूर होतात आणि त्वचा अधिक नितळ दिसते. शेव्हिंगनंतर फाउंडेशन आणि इतर मेकअप प्रोडक्स्ट्स त्वचेवर अधिक चांगल्या प्रकारे बसतात. तसंच शेव्हिंगदरम्यान मृत त्वचेच्या पेशी दूर झाल्याने हलकं एक्सफोलिएशनही होतं.

Facial hair removal | saam tv

शेव्हिंगचे दुष्परिणाम

चुकीच्या पद्धतीने शेव्हिंग केल्यास त्वचेवर जळजळ, खाज किंवा रेझर बर्न होऊ शकतो. रेझर वापरताना त्वचेवर लहान कट, ओरखडे किंवा लालसरपणा दिसू शकतो. काही वेळा केस त्वचेच्या आत वाढू लागल्याने इंग्रोन हेअर आणि लहान पुटकुळ्यांची समस्या निर्माण होऊ शकते.

Face razor for women | saam tv

प्रत्येक महिलेसाठी फेस शेव्हिंग योग्य नसतं

सेंसेटीव्ह त्वचा असलेल्या महिलांनी फेस शेव्हिंग करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चेहऱ्यावर मुरुम, एक्झिमा, सोरायसिस किंवा रॅशेस असल्यास त्या भागावर शेव्हिंग टाळणं योग्य आहे. अशा स्थितीत शेव्हिंगमुळे त्वचेची समस्या अधिक वाढू शकते.

Razor burn | saam tv

कारण शोधणं गरजेचं

चेहऱ्यावर अचानक किंवा नेहमीपेक्षा जास्त केस वाढत असतील तर त्यामागे हार्मोनल बदल असण्याची शक्यता असते. अशा वेळी केवळ शेव्हिंग करून समस्या लपवण्याऐवजी त्यामागील कारण शोधणं आवश्यक आहे.

Face shaving benefits | saam tv

ही काळजी घ्या

नेहमी स्वच्छ, निर्जंतुक आणि धारदार फेस रेझरचाच वापर करावा. शेव्हिंगनंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावावं आणि बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करावा. शेव्हिंगनंतर सतत जळजळ, लालसरपणा किंवा इन्फेक्शन दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Dermatologist advice | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hair removal methods | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा