Health Care: तूप लावलेली चपाती खल्ल्याने वजन कमी होते की वाढते?

Shruti Vilas Kadam

तूपमुळे वजन वाढवतेच असे नाही

तूप हे आरोग्यदायी फॅट्सचे स्रोत मानले जाते. योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास ते शरीराला एनर्जी देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

Health Care

प्रमाण महत्त्वाचे आहे

चपातीवर जास्त प्रमाणात तूप लावल्यास अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे तुपाचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

Chapati History

पचनक्रिया सुधारण्यास मदत

तुपातील पोषक घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. चांगले पचन झाल्यास शरीरातील पोषकतत्त्वांचे शोषण अधिक प्रभावीपणे होते.

Chapati History

जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते

तुपातील फॅट्समुळे भूक लवकर लागत नाही. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊन कॅलरी सेवनावर नियंत्रण ठेवता येते.

chapati | yandex

वजन कमी करण्याच्या आहारातही उपयोगी

अनेक न्यूट्रिशनिस्ट वजन कमी करण्याच्या आहारात मर्यादित प्रमाणात तुपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराला आवश्यक फॅट्स मिळतात.

Chapati History

जीवनशैलीवर परिणाम अवलंबून

तुप लावलेली चपाती खाल्ल्यानंतर नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली असेल तर वजन वाढण्याची शक्यता कमी होते.

chapati | yandex

प्रत्येकाची शारीरिक गरज वेगळी असते

वय, वजन, आरोग्यस्थिती आणि दैनंदिन हालचाली यानुसार तुपाचा परिणाम बदलू शकतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार तुपाचे प्रमाण ठरवणे योग्य ठरते.

Chapati | yandex

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

Sunscreen
येथे क्लिक करा