Sakshi Sunil Jadhav
लोक रोजच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. मात्र चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
पुढे आपण याचे उत्तर जाणून घेऊयात.
चहामध्ये टॅनिन्स नावाचे घटक असतात. हे घटक अन्नातील आयरनशी जुळून जातात आणि शरीरात आयरनचे शोषण कमी करतात.
डाळी, कडधान्ये, भाज्यांमधून मिळणारे नॉन-हीम आयरन आधीच कमी प्रमाणात शोषले जाते. चहा घेतल्याने ते अजून कमी प्रमाणात शरीरात शोषले जाते.
जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास अन्नातील लोह शोषणावर जास्त परिणाम होतो. तज्ञांच्या मते, जेवणानंतर किमान 1 ते 2 तासांनी चहा घ्यावा.
दिवसातून 4–5 कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास लोहाची कमतरता होण्याची शक्यता वाढते.
विशेषतः स्त्रिया, गर्भवती स्त्रिया आणि मुलांमध्ये हा धोका जास्त असतो.
थकवा, अशक्तपणा, डोके हलके होणे, केस गळणे, त्वचेवर पांढुरकेपणा ही आयरनच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत.