Sakshi Sunil Jadhav
काही व्यक्तींना थंड पाणी प्यायल्याशिवाय पाणी प्यायल्यासारखे वाटतचं नाही.
काहींना असा प्रश्न असतो की थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते का?
पचनसंस्था ही अशी प्रक्रिया आहे त्याने शरीर अन्नाचे विघटन होते आणि रक्तप्रवाहात पोषक तत्वे सोडते.
पोट, आतडे आणि अनेक एंजाइम पचनसंस्थेत असतात.
थंड पाणी प्यायल्याने पोटाचे स्नायू काही काळासाठी मंदावतात.
वैज्ञानिक संशोधनातून असे साध्य झाले आहे की, थंड पाणी काही मिनिटांत शरीराच्या तापमानाएवढे होते. तसेच तात्पुरताच शरीरावर परिणाम होतो.
थंड पाण्याचा परिणाम सौम्य आणि तात्पुरता असतो. त्याचा पचनक्रियेवर गंभीर आणि हानिकारक परिणाम होत नाही.
व्यायामानंतर तुमचे शरीर उष्ण होत असेल तर थंड पाणी तुम्ही सेवन करू शकता.
ज्या लोकांना आम्लपित्त, सर्दी किंवा पचनाच्या समस्या असतात त्यांना खूप थंड पाणी प्यायल्यावर त्रास होऊ शकतो.