ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना सकाळची सुरुवात कॉफीने करायला आवडते. कॉफी हा अनेकांचा आवडता पेय आहे. पण कॉफी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते का? जाणून घ्या.
काहींच्या मते, कॉफी प्यायल्याने साखरेची पातळी वाढते. परंतु कॉफीमुळे रक्तातील साखरेची पातळी थेट वाढत नाही.
काही लोकांमध्ये, कॅफिनमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी करु शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
कॉफीमधील कॅफीन, शरीरातील अॅड्रेनालाईनला उत्तेजित करु शकतात. यामुळे तात्पुरती ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
साखर आणि क्रिमर असलेली कॉफी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. म्हणून कमी साखर असलेली कॉफी प्या.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर विना साखरेची कॉफी प्या. किंवा कॅफीनचे प्रमाण मर्यादित करा.
कॉफीमध्ये मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारखे घटक असतात. जे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात.