Saam Tv
आताच्या प्रत्येक गृहीणी पुरुषांच्या बरोबरीने संपुर्ण दिवस कामात व्यस्त असतात.
त्यात स्वयंपाकाला बऱ्याच वेळेस अधिक वेळ द्यावा लागतो. त्याची आता गरज नाही. तुम्ही आता अगदी एक तासाच्या आत तुमचा स्वयंपाक आवरू शकता. फॉलो करा पुढील टिप्स
स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्याची तयारी करा. सर्व भाज्या कापून ठेवा, सर्व मसाले एकत्र एका डब्यात ठेवा.
अनेक पदार्थ एकाच वेळी करता येतात. जसे की भाजी , भात शिजवणे किंवा डाळ शिजवणे.
प्रेशर कुकर मध्येपदार्थ लवकर शिजतात. डाळ, भात, कडधान्ये इत्यादी पदार्थ पटकन शिजवता येतात.
मिक्सर, ग्राइंडर, फूड प्रोसेसर यांचा उपयोग करा. भाज्यांचे तुकडे झटपट कापता येतात आणि मसाले चांगले मिक्स करता येतात.
उकडणे, स्टिर-फ्राय करणे किंवा तळणे यांसारख्या स्टेपचा वापर करा. यामुळे स्वयंपाक लवकर होईल.
जेवण तयार करताना कमी भांड्यांचा वापर करा त्याने किचनवरील गोंधळ आवरताना कमी वेळ लागेल.
जर तुम्ही विशेष मसाले किंवा पेस्ट बनवली आहे, तर ती वेळोवेळी वापरण्याची तयारी ठेवा. यामुळे वेळ कमी होईल. या टिप्स वापरून तुम्ही स्वयंपाक अगदी कमी वेळात आणि सोयीस्करपणे पूर्ण करू शकता.
NEXT: मधुमेही रुग्ण इडली खाऊ शकतात की नाही?