Dhanshri Shintre
कामाचे अतिरिक्त तास सर्वसाधारणपणे १२ ते १६ तास काम करूनही २४ तास इमर्जन्सीसाठी उपलब्ध असावे लागते. रेसिडेन्सीमध्ये (वैद्यकीय शिक्षण घेताना) तर २४ तास ऑन कॉल ड्यूटी असते.
विश्रांतीचा अभाव सतत त्याच वातावरणात काम केल्याने शरीर आणि मन थकून जाते आणि कामात यांत्रिकता येते.
उपचारांदरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांचा रोष, गैरसमज, कुप्रसिद्धीची भीती असते.
डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा, सुट्टी, सणवार, कौटुंबिक कार्यक्रमादरम्यानसुद्धा त्याने फोन उचलावा, असाध्य आजार असला तरी 'बरा झालाच पाहिजे' अशी अपेक्षा ठेवली जाते.
सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे, सुविधांचा अभाव असल्याने योग्य निदान करून उपचार करणे आव्हानात्मक ठरते.
राजकीय हस्तक्षेप, रुग्णालयांची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण या प्रकारांचा ताण येतो.
डॉक्टरांना आजाराबद्दल शिकवले जाते, उपचार शिकवले जातात, पण मनाचे स्वास्थ्य कसे सांभाळायचे हे शिकवले जात नाही. हे सर्वच शिक्षणपद्धतींना लागू होते.
काही रुग्णालयांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करताना होणारी डोकेदुखी, उशिरा बिल मिळणे, विमा कंपन्यांची मनमानी यांमुळेही डॉक्टर्सवरचा ताण वाढतो.