Liver disease: रात्री पोटऱ्यांना सतत खाज येतेय? लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये दिसतात हे 4 मोठे संकेत

Surabhi Jayashree Jagdish

फॅटी लिव्हर

अतिरिक्त वजन, लठ्ठपणा आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. जास्त तेलकट, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेलं अन्न सतत खाल्ल्याने यकृतामध्ये चरबी साचते.

Liver damage | saam tv

मद्यपान

दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणं हे लिव्हर खराब होण्याचं प्रमुख कारण आहे. काही औषधांचा अतिरेक, अमली पदार्थ यामुळेही लिव्हरच्या पेशींना इजा होऊ शकते.

Liver health | saam tv

व्हायरल इन्फेक्शन

हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी यांसारखे बॅक्टेरिया लिव्हरला दीर्घकालीन नुकसान पोहोचवू शकतात. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि काही आनुवंशिक समस्यांमुळे लिव्हरच्या आजारांचा धोका वाढतो.

Night leg symptoms | saam tv

रात्री पायांमध्ये सूज येणं

लिव्हर गंभीरपणे खराब झाल्यावर शरीरात द्रव साचू लागतो त्यामुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज दिसू शकतं. दिवसभर उभं राहिल्यानंतर किंवा रात्री झोपताना ही सूज अधिक जाणवू शकते.

Leg cramps | saam tv

पायांमध्ये तीव्र खाज येणं

लिव्हरचं कार्य बिघडल्यामुळे पित्तातील काही घटक रक्तात वाढू शकतात आणि त्यामुळे त्वचेला खाज येऊ शकते. ही खाज विशेषतः रात्री पायांच्या तळव्यांमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये येते. सतत खाज येत असल्यास डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी.

Tingling in feet | saam tv

पायांमध्ये गोळे येणं

लिव्हरच्या गंभीर आजारांमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन झालं की रात्री पायांमध्ये गोळे येऊ शकतात. झोपेत अचानक पोटऱ्यांमध्ये वेदना होणं हे काही रुग्णांमध्ये आढळणारं लक्षण आहे. मात्र हे लक्षण इतर कारणांनीही होऊ शकतं.

Peripheral neuropathy | saam tv

पायांमध्ये मुंग्या येणं

लिव्हरचं कार्य गंभीरपणे बिघडल्यास काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंवर परिणाम होऊन पायांमध्ये मुंग्या येणं, बधिरपणा किंवा जळजळ जाणवू शकतो. ही लक्षणं रात्री विश्रांतीच्या वेळी अधिक स्पष्ट वाटू शकतात.

Hepatitis | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diabetes symptoms | saam tv

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Mahabharata characters | saam tv
येथे क्लिक करा