Morning swollen feet: सकाळी उठल्यावर तुमचेही पाय सुजतात का? शरीर देतंय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Surabhi Jayashree Jagdish

पायांवर सूज येणं

सकाळी उठल्यावर पायांना सूज दिसणं हे नेहमीच साधं लक्षण नसतं. शरीरात अतिरिक्त द्रव साचणं, रक्ताभिसरणातील बिघाड किंवा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यातील समस्या यामुळे अशी सूज येऊ शकते. विशेषतः ही सूज वारंवार दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Swollen feet causes | saam tv

हार्ट अटॅकचं लक्षण

हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरातील रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे पायांमध्ये आणि घोट्यांमध्ये पाणी साचून सूज निर्माण होऊ शकते. जर पायांच्या सूजेसोबत श्वास लागणं, छातीत जडपणा किंवा लवकर थकवा जाणवत असेल तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edema symptoms | saam tv

किडनीचे आजार

किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ लघवीद्वारे बाहेर टाकण्याचं काम करतं. किडनीचं कार्य बिघडल्यास शरीरात द्रव साचतो आणि सकाळी उठल्यावर पायांसह चेहऱ्यावरही सूज दिसू शकते. यासोबत लघवीचं प्रमाण बदलणं, थकवा किंवा रक्तदाब वाढणं अशी लक्षणंही आढळू शकतात.

Heart disease symptoms | saam tv

लिव्हरच्या समस्या

लिव्हरच्या आजारांमध्ये रक्तातील अल्ब्युमिन या प्रोटीनचं प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील द्रव टिश्यूंमध्ये जाऊन पायांना सूज येते. जर पायांच्या सूजेसोबत पोट फुगणं, त्वचा किंवा डोळे पिवळे पडणं अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीने तपासणी करणं गरजेचं आहे.

Kidney disease symptoms | saam tv

पायांच्या शिरा कमकुवत होणं

पायांतील शिरांमधील झडपा (Valves) व्यवस्थित काम करत नसल्यास रक्त हृदयाकडे योग्यरीत्या पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्त आणि द्रव पायांमध्ये साचून सूज येऊ शकतं. अशा वेळी पाय जड वाटणं, शिरा फुगणं किंवा दीर्घकाळ उभे राहिल्यानंतर त्रास वाढणं ही लक्षणं दिसू शकतात.

Liver disease signs | saam tv

शरीरात द्रव साचल्यास काय होतं?

एडिमा म्हणजे शरीराच्या पेशींमध्ये अतिरिक्त द्रव साचू लागतं. हा स्वतः आजार नसून अनेक गंभीर आरोग्य समस्यांचं महत्त्वाचे लक्षण असू शकतं. त्यामुळे वारंवार सकाळी पायांना सूज येत असल्यास त्यामागील मूळ कारण शोधणं गरजेचं आहे.

Poor blood circulation | saam tv

कधी घ्यावी डॉक्टरांची भेट?

पायांच्या सूजेसोबत श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणं किंवा अचानक वजन वाढणं दिसल्यास उशीर करू नये. चेहरा, हात किंवा संपूर्ण शरीरावर सूज येणं हेही गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

Chronic venous insufficiency | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Fluid retention in legs | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा