Spider Webs at Home: घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी कोळ्यांची जाळी दिसतायत? हे हॅक्स वापरून बघाच

Surabhi Jayashree Jagdish

घराची स्वच्छता ठेवा

कोळ्यांना घरातील शांत, अंधाऱ्या आणि कमी वापरल्या जाणाऱ्या जागा आवडतात. सोफा किंवा बेडच्या मागे, स्टोअर रूममध्ये, कपाटाच्या मागे आणि जुन्या सामानामध्ये कोळी जाळी तयार करू शकतात. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता करा आणि पंखे, खिडक्यांचे कोपरे, दरवाजांच्या मागील बाजूस तसेच फर्निचरच्या आसपास झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छता करा.

Home Cleaning Tips

दरवाजे आणि खिडक्यांमधील फटी बंद करा

अनेकदा कोळी दरवाजे आणि खिडक्यांमधील छोट्या फटींमधून घरात प्रवेश करतात. त्यामुळे खिडक्यांच्या चौकटी, दरवाजांच्या कडा, पाइपच्या आसपास आणि हवा येण्या-जाण्याच्या जागा तपासा. कुठे फट किंवा मोकळी जागा दिसल्यास ती सील करा आणि खिडक्यांची जाळी फाटली असल्यास दुरुस्त करा.

Spiders in House | saam tv

पांढऱ्या व्हिनेगरचा उपाय

घरातील एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात वारंवार कोळ्यांची जाळी तयार होत असेल, तर पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी पांढरे व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. हे मिश्रण खिडक्यांच्या चौकटी, दरवाजांच्या आसपास आणि जाळी दिसणाऱ्या जागांवर हलके फवारा.

Vinegar Spider Repellent | saam tv

घराच्या बाहेरील स्वच्छता

कोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी फक्त घराच्या आतील स्वच्छता पुरेशी नाही तर घराबाहेरही स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. घराच्या भिंतींना लागून वाढलेल्या झुडपांमध्ये, झाडांमध्ये, लाकडांच्या ढिगाऱ्यांमध्ये आणि जुन्या सामानामध्ये कोळी लपून बसू शकतात. त्यामुळे घराच्या बाहेरील भिंतींपासून झाडं थोडी दूर ठेवा.

Prevent Spider Webs | saam tv

घरातील कमी वापरल्या जाणाऱ्या जागा

घरातील स्टोअर रूम, कपाटांच्या मागील बाजू आणि फर्निचरखालील जागा यांची वेळोवेळी तपासणी करा. अशा ठिकाणी कोळी सहज लपून राहू शकतात आणि जाळी तयार करू शकतात. त्यामुळे या जागांमधील धूळ आणि कोळ्यांची जाळी नियमितपणे स्वच्छ करा.

Cleaning Ceiling Corners | saam tv

अनावश्यक सामान

बाल्कनीमध्ये अनेकदा जुन्या वस्तू, रिकामे बॉक्स आणि इतर सामान बराच काळ पडून राहते. अशा सामानामध्ये कोळ्यांना लपण्यासाठी जागा मिळू शकते आणि ते तिथे जाळी तयार करू शकतात. त्यामुळे बाल्कनीतील अनावश्यक वस्तू काढून टाका आणि ही जागा नियमितपणे स्वच्छ ठेवा.

Balcony Cleaning Tips | saam tv

Gas Stove and Sink Distance: गॅस शेगडी आणि सिंकमध्ये किती अंतर असावं?

Gas Stove and Sink Distance | saam tv
येथे क्लिक करा