दरवाजावर बॉक्स डिझाइन का असतं तुम्हाला माहितीये का? पाहा कारण

Surabhi Jayashree Jagdish

रोज दिसणाऱ्या गोष्टी

आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक वस्तू पाहतो. काही गोष्टींकडे आपलं लक्ष जातं, तर काही गोष्टी आपण सहज दुर्लक्ष करतो.

Reason behind box design in doors

लक्ष आणि दुर्लक्ष

दैनंदिन वापरातल्या अनेक गोष्टींचा आपण कधी अर्थ लावण्याचा प्रयत्नही करत नाही. पण त्यामागे अनेकदा महत्त्वाचं कारण असतं.

design

मजेशीर तथ्य

आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जिचा उपयोग माहित असूनही बहुतेकांना त्यामागचं कारण माहीत नसतं. ही गोष्ट काय आहे ते पाहूयात.

Door design architecture explained

दरवाज्यांवरील बॉक्ससारखी रचना

घरांच्या लाकडी दरवाज्यांवर बॉक्स टाइप किंवा चौकोनी डिझाइन असतं. ही रचना जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळते. अनेक घरांमध्ये ती आजही वापरात आहे.

Benefits of box design in doors

कारण

बहुतेक लोकांना वाटतं की ही रचना केवळ डिझाइनसाठी असते. मात्र प्रत्यक्षात यामागे महत्त्वाचं कारण आहे. ही रचना दरवाज्याच्या मजबुतीसाठी उपयोगी ठरते.

Door design traditional style

रेज्ड पॅनल

दरवाज्यावर दिसणाऱ्या या आयताकृती रचनेला ‘रेज्ड पॅनल’ असं म्हणतात. ही रचना लाकडाला नैसर्गिक बदलांपासून संरक्षण देते. विशेषतः लाकडाच्या हालचाली नियंत्रित करण्याचं काम ती करते.

Door design modern architecture

टिकाऊपणा

लाकूड ओलावा आणि हवामानामुळे फुगतं किंवा आकुंचन पावतं. यामुळे दरवाज्यात तडे जाण्याची शक्यता वाढते. रेज्ड पॅनलमुळे हा धोका कमी होतो आणि दरवाजा दीर्घकाळ टिकतो

Door design cultural significance

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा