ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी सिनेसृष्टीत प्रार्थनाने तिच्या अदाकारीने सर्वांनाच थक्क केले आहे. सोज्वळ रूपातील प्रार्थना कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये प्रार्थना दिसली. प्रार्थनाने केवळ मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे २०१७ मध्ये अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. या दोघांनीही अरेज मॅरेंज लग्न केलं आहे.
अभिषेक जावेकर सिनेसृष्टीशी जोडला आहे. तो लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
कामातून वेळ काढत प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रिय राहते ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
प्रार्थनाची युट्यूब मुलाखत जोरदार व्हायरल झाली. प्रार्थनाने तिला मूल नको असल्याचं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.