Surabhi Jayashree Jagdish
आंघोळ ही स्वच्छतेसाठी केली जाणारी साधी प्रक्रिया असते. यात फक्त पाणी वापरून शरीर स्वच्छ केले जाते. साबण वापरला जाऊ शकतो. वाईट जागा जसं की, स्मशानातून आल्यानंतर आंघोळ केली जाते
“स्नान” हा शब्द विशेषतः पूजा, व्रत, उत्सव किंवा पूजा करण्याआधी केलेल्या शुद्धीकरणासाठी वापरला जातो. यामध्ये पवित्र नद्यांमधील पाणी, तुळशी, गंगाजल किंवा मंत्रांचा वापर केला जातो.
अभ्यंगस्नानमध्ये तेल लावून संपूर्ण शरीराची मालिश केली जाते आणि त्यानंतर गरम पाण्याने स्नान केले जाते. हे प्रामुख्याने सण, खास करून दिवाळीच्या नरक चतुर्दशीला केले जाते.
साधी आंघोळ दिवसभरात कोणत्याही वेळी केली जाऊ शकते. स्नान प्रामुख्याने सूर्योदयापूर्वी किंवा पूजा करण्यापूर्वी केले जाते. अभ्यंगस्नान सूर्योदयाच्या आधी शुभ मुहूर्तात करणं योग्य मानलं जातं.
आंघोळचा उद्देश फक्त शरीर स्वच्छ ठेवणे असतो. स्नानाचा उद्देश धार्मिक शुद्धी, मनशांती आणि आध्यात्मिक स्वच्छता हा असतो. अभ्यंगस्नानाचा उद्देश आरोग्य सुधारणा, दोषनिवारण आणि उत्सवपूर्व तयारी असतो.
आंघोळीत केवळ पाणी आणि साबण वापरलं जातात. स्नानात गंगाजल, तुळस, गोमूत्र किंवा मंत्रोच्चारासह पाणी वापरलं जातं. अभ्यंगस्नानात तिळाचं तेल, औषधी तेल, उटणं, सुगंधी पावडर आणि गरम पाणी वापरलं जातं.
दैनंदिन आंघोळ शरीरातील घाम, धूळ आणि जंतू काढते. स्नान मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक समाधान देते. अभ्यंगस्नान रक्ताभिसरण सुधारते, सांध्यांना ताकद देते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.