CV आणि Resume मध्ये काय फरक आहे माहितीये का? 99% लोकांना नसेल माहिती

Surabhi Jayashree Jagdish

CV आणि Resume

तुम्हाला माहिती आहे का की CV आणि Resume यामध्ये काय फरक असतो आणि त्यांचा वापर कुठे केला जातो? दोन्ही डॉक्युमेंट्स तुमचा अनुभव दाखवतात.

CV कधी वापरतात

CV प्रामुख्याने शैक्षणिक कामांसाठी वापरले जाते. CV म्हणजे Curriculum Vitae ज्यामध्ये शैक्षणिक माहिती सविस्तर दिली जाते. हे संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी उपयुक्त असते.

ग्रॅज्युएट स्कूल

CV प्रामुख्याने ग्रॅज्युएट स्कूल आणि फॅकल्टीसाठी वापरलं जातं यात उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, संशोधन आणि प्रकाशनांचा तपशील दिला जातो. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात याला विशेष महत्त्व आहे.

शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास

CV मध्ये अनेक पानांचा समावेश असू शकतो. कारण यात उमेदवाराचा संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास जातो. त्यामुळे ते Resume पेक्षा अधिक विस्तृत असते.

कौशल्यं आणि काम

Resume प्रामुख्याने कौशल्यं आणि कामाचा अनुभव दाखवण्यासाठी वापरलं जातं. हे नोकरीसाठी अर्ज करताना महत्त्वाचं ठरतं. Resume मध्ये उमेदवाराची व्यावसायिक माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली जाते.

नोकरी

Resume चा वापर प्रामुख्याने नोकरीसाठीच केला जातो. यात उमेदवाराची कौशल्ये, अनुभव आणि कामगिरी अधोरेखित केली जाते.

एक पान

साधारणपणे Resume एका पानाचे असते. काही प्रसंगी ते दोन पानांचंही असू शकतं. पण ते नेहमीच संक्षिप्त आणि थोडक्यात माहिती देणारे असते.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांमध्ये कच्च्या कांद्याची फोडणी देऊ नये? भाजीची चव बिघडेल

Cooking Tips No Onion | saam tv
येथे क्लिक करा