Surabhi Jayashree Jagdish
आपण दररोज मराठीमध्ये संवाद साधताना नकळत अनेक इंग्रजी शब्द बोलून जातो. असेच अनेक शब्द आपण बोलतो पण त्याचा मराठी शब्द किंवा अर्थ आपल्याला ठाऊक नसतो.
आपण दररोजच्या वापरत असलेली एक गोष्ट म्हणजे पाण्याचा ग्लास. घरी, ऑफिसमध्ये किंवा अगदी बाहेर एखाद्या कार्यक्रमात देखील ग्लासाचा वापर केला जातो. मात्र याचा मराठी शब्द तुम्हाला माहितीये का?
सोशल मीडियावर अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येतोय. यामध्ये ग्लास या शब्दाला मराठी अर्थ काय आहे, असा प्रश्न केला जातोय.
आपली मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा मानली जाते. त्यामुळे मराठी भाषेत प्रत्येक वस्तूला स्वतंत्र शब्द असल्याचं तुम्हाला समजेल. पूर्वीच्या काळात वस्तूंचे मराठी पारंपारिक शब्द वापरले जायचे.
मात्र सध्याच्या काळात इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव दिसून येतो. त्यामुळे आपण मराठी शब्द असूनही इंग्रजी प्रचलित शब्दांचा दैनंदिन जीवनात वापर करतो.
तुम्हालाही ग्सालाला मराठीच काय म्हणतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. अनेकांनी वेगवेगळी उत्तरं मनात तयार केली असावीत. तर याचं उत्तर काय आहे ते जाणून घेऊया.
पाणी पिण्याच्या ग्लासाला मराठी पेला असं म्हणतात. जुन्या काळात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. आजही ग्रामीण भागात पेला या शब्दाचा बोलण्या वापर केला जातो.