ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळच्या नाश्ट्यामध्ये आपण चहा कॉफीचे सेवन करतो. मात्र यांचा आपल्या आरोग्याला काही फायदा होत नाही. निरोगी शरीरासाठी आहारात पोषक त्तवांचा समावेश करणे आवश्यक असते.
आहारात फळांचा समावेश केल्यास अनेक फायदे होतात त्याचे कारण म्हणजे त्यामधील पोषक गुणधर्म. पण तुम्हाला माहिती आहे का सकाळी चिकू खाल्यावर किंवा चिकू मिल्कशेक प्यायल्यावर शरीर दिवसभर ताजे तवाणे राहाते.
चिकूमध्ये प्रथिने, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमिन बी, ई, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
चिकूमध्ये अँटीऑक्सिंडट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
चिकू खाल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
चिकूचे सेवन केल्यास तुमची पचन शक्ती सुधारते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.
चिकू खाल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.