Manasvi Choudhary
तिरंग्याचा पडदा किंवा वस्त्रांच्या रूपात उपयोग केला जाऊ शकत नाही.
तिरंगा सूर्योदयानंतर फडकवला जातो आणि त्यानंतर सूर्यास्त होण्याआधी उतरवला जातो.
एखाद्या कार्यक्रमातील मंचावर तिरंगा फडकावल्यास वक्ता भाषण करत असल्यच्या उजव्या बाजूला ध्वज असावा.
राष्ट्रीय ध्वज इतर कोणत्याही झेंड्यापेक्षा उंचीवर असावा.
तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहलेली असू नयेत.
टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट म्हणून तिरंग्याचा वापर करू नये.
फडकवण्यात येणारा तिरंगा फाटलेला, मळलेला व चुरगळलेला स्थितीत असू नये
तिरंग्यामध्ये केशरी रंग नेहमी वर असावा.
राष्ट्रीय ध्वज हा सूती किंवा खादीपासून बनवलेला असावा. झेंड्याची लांबी आणि रुंदी ३:२च्या प्रमाणात असावी.