Ankush Dhavre
तुम्ही रेल्वे स्थानकावर गेलेच असाल आणि तेव्हा TC नक्कीच पाहिला असेल.
आपण रेल्वेतून उतरल्यानंतर टीसी आपलं तिकीट चेक करतो, जर तिकीट नसेल, तर तो आपल्यावर कारवाई करतो.
मात्र तुम्ही टीटी हा शब्दही कधीतरी ऐकलाच असेल.
टीटी आणि टीसीमध्ये नेमका काय फरक असतो? हे खूप कमी लोकांना माहित असेल.
टीटी आणि टीसीमध्ये फार काही फरक नसतो.
टीसीला तिकीट चेकर असे म्हणतात. टीसी तुम्हाला रेल्वेच्या आत तिकीट विचारु शकत नाही.
तुम्ही एकदा रेल्वेच्या बाहेर पडले, की टीसी तिकीट चेक करु शकतात.
तर टीटीला तिकीट चेकर एक्झामिनर असं म्हणतात, टीटीकडे प्रवास करताना तिकीट चेक करण्याचा अधिकार असतो. यासह योग्य बर्थ आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारीही असते.