Highway vs expressway: हायवे आणि एक्सप्रेस-वे यांच्यातील फरक माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

मोठे हायवे

भारतात सध्या प्रत्येक राज्यात मोठे-मोठे हायवे आणि एक्सप्रेस-वे बांधले जातायत. यामुळे लोकांचा प्रवासाचा वेळ वाचतोय. तसंच देशाच्या विकासालाही मोठा हातभार लागतोय आहे.

काय फरक

हायवे आणि एक्सप्रेस-वे याबद्दल अनेक लोकांना अजूनही योग्य माहिती नाहीये. दोन्ही रस्त्यांमध्ये नेमका काय फरक आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. म्हणून ही माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे.

जास्त वेग

एक्सप्रेस-वेवर वाहने खूप जास्त वेगाने चालतात. त्यामुळे इथे साधारणपणे 6 ते 8 लेन असतात.

म्हणून हा रस्ता जलद प्रवासासाठी ओळखला जातो.

लेनची संख्या

हायवेवर गाड्यांचा वेग एक्सप्रेस-वेच्या तुलनेत कमी असतो. इथे साधारण 2 ते 4 लेन असतात. म्हणून हा रस्ता थोडा सामान्य वेगासाठी वापरला जातो.

कंट्रोल्ड अ‍ॅक्सेस

एक्सप्रेस-वे पूर्णपणे कंट्रोल्ड अ‍ॅक्सेस असतो. म्हणजे कुठूनही थेट रस्त्यावर प्रवेश किंवा बाहेर पडता येत नाही. प्रवेश आणि निर्गमनासाठी ठराविक मार्गच असतात.

वाहनांची ये-जा

हायवेवर मात्र कुठूनही वाहने येऊ-जाऊ शकतात. इथे मध्ये मध्ये चौक आणि सिग्नलही असतात. म्हणून वाहतूक तुलनेने अधिक मोकळी असते.

गरजेनुसार वापर

एक्सप्रेस-वेवर दोनचाकी आणि ऑटो सारखी वाहनं चालत नाहीत. पण हायवेवर सर्व प्रकारची वाहने चालू शकतात. म्हणून दोन्ही रस्त्यांचा वापर वेगवेगळ्या गरजेनुसार केला जातो.

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Blood Circulation
येथे क्लिक करा