Manasvi Choudhary
टिव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
तेजश्री नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ तेजश्री पोस्ट करते.
तुम्हाला तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते हे माहितीये का? माहितीनुसार, तेजश्रीने पाच वर्षापूर्वी गोरेगाव येथे घर घेतलं आहे.
तेजश्री प्रधान मूळची डोबिंबलीची आहे. तिचं बालपण, शिक्षण येथे झालं आहे.
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ मध्ये झाला आहे. तेजश्री लहानांची मोठी डोंबिवली मध्ये झाली आहे.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री प्रधान घराघरात लोकप्रिय झाली.