ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरात काही चहाप्रेमी आहेत तर काही कॉफीप्रेमी आहेत.
देशभरात कॉफी पिण्याऱ्या लोकांची कमतरता नाही आहे.
काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करत असतात.
प्रत्येक कॉफीच्या बीन्सची वेगवेगळी चव असते. त्याचबरोबर लोक वेगवगळ्या कॉफी ट्राय सुध्दा करतात.
पण कॉफी कशी बनते असा प्रश्न सर्वानांच पडत असतो.
परदेशात काही कॉफीच्या बिया पशुपक्ष्यांच्या विष्ठेपासून बनवल्या जातात. चला जाणून घेऊया.
लुवाक कॉफीला सिवेट कॅाफी म्हटले जाते. लुवाक कॉफी एशियन पाम सिवेटच्या विष्ठेतून गोळा केलेल्या बीन्सपासून बनवली जाते.
ब्लॅक आयव्हरी कॉफी सर्वात महाग असून या कॅाफीची बीन्स हत्तीच्या विष्ठेपासून बनवली जातात. थायलंडमध्ये तुम्ही ही कॉफी खरेदी करु शकता.
जाकू बर्ड कॉफी ब्राझिलियन पक्ष्यांच्या विष्ठेतून गोळा करुन बनवली जाते. ब्राझील शहरात हे सर्वात मोठे कॉफी उत्पादन आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: नवरात्रीच्या उपवासाला 'या' पाच गोष्टी खा; दिवसभर वाटेल फ्रेश