ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला विशेष महत्त्व असते. या दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत नागरिक उपवास करत असतात. म्हणूनच उपवासादरम्यान शरीररात ऊर्जा राहण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करा.
नवरात्रीच्या उपवासात साबुदाण्याचे पदार्थ चवदार असून त्यात अनेक पोषक घटक असतात. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात फायबर असल्याने साबुदाणा दिवसभर आपल्या शरीराला एनर्जेटिक ठेवत असतो.
नवरात्रीच्या उपवासात आपल्या आहारात मखान्याचा समावेश करा. मखाने खाल्याने पोट बराच वेळ भरलेल राहते आणि एनर्जी सुध्दा कमी होत नाही.
नवरात्रीच्या उपवासात किवी किंवा संत्री खा. या दिवसांत संत्री आणि किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
नवरात्रीच्या दिवसांत वेगवेगळ्या प्रकारे हिरव्या भाज्या शिजवून तुम्ही स्वादिष्ट पदार्थ तयार करु शकता. हिरव्या भाज्या पोषक असल्याने त्या आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
उपवासाच्या दिवशी ड्राय फ्रूट्सचा नेहमी समावेश करावा. ड्रायफ्रूट्समध्ये असलेली जीवनसत्वे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT : 'कोकण कन्या' अंकिता वालावलकर कितवी शिकलीये?