ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मखाना एक आरोग्यदायी ड्रायफ्रूट आहे.
मखानामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे आणि कॅल्शिअम,मॅग्नेशियम,लोह,फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असते.
मखाना हा पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि पोटाचे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.
रोज दूधात एक मखाना उकळून त्याचे सेवन केल्याने आपले हाडे आणि स्नायू बळकट होतात.
दररोज मखाना खाल्याने आपली त्वचा निरोगी राहते त्याबरोबर केस मजबूत होतात.
वजन कमी करण्यासाठी मखाना एक उत्तम पर्याय आहे.
तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही दुधात भिजवलेला मखाना खाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: घड्याळ्याच्या वेळेमधील AM-PM शब्दाचा फुल फाॅर्म काय?