ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्याच्या फायद्यासाठी देखील वापरली जाते. कोथिंबीरीत फॉस्फरस, कॅल्शियम सोडियम सारखे महत्त्वाचे घटक आढळतात.
कोथिंबीरधील एन्झाईम्स शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.
कोथिंबीरीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे ब्लोटिंग आणि बद्धकेष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
कोथिंबीरीमुळे तणाव कमी होतो आणि मुड सुधारतो, त्यामुळे कोथिंबीरीचे सेवन केल्यास लाभ होतो.
कोथिंबीरमधील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
कोथिंबीरमध्ये फायबरसल भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोथिंबीरमध्ये टेरपीनेन, टोकोफेरॉलसह अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरॉटीनोइड्स असतात, ज्यामुळे तुमची दृष्टी तीक्ष्ण होते.