Dhanshri Shintre
तोंडात जर अल्सर झाले, तर खाणं-पिणं आणि बोलणं अशक्य होईल इतकं वेदनादायक ठरू शकतं.
तोंडात अल्सरचा त्रास होत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल; जाणून घ्या घरगुती उपाय काय आहेत.
कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचा त्रास कमी होतो.
मीठात असलेले अँटीबॅक्टेरियल घटक तोंडातील अल्सरमधील जीवाणूंना नष्ट करून वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करतात.
कोरफडीच्या ताज्या पानांमधून जेल काढून टाळूवर लावल्यास थंडावा आणि पोषण मिळते.
कोरफडीचे जेल तोंडात लावल्यास अल्सरमुळे होणारी जळजळ आणि वेदना नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.
मधामुळे अल्सर ओलसर राहतो, त्यामुळे वेदना कमी होतात आणि त्याच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेला गती मिळते.