Dhanshri Shintre
रात्री अचानक घाम येणे हे केवळ उष्णतेमुळे नाही, तर शरीरातील काही गंभीर आरोग्य समस्या सुचवणारे लक्षण असू शकते.
थायरॉईड आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे महिलांना रात्री जास्त घाम येण्याची शक्यता असते.
टीबी, एचआयव्ही किंवा जीवाणूजन्य संसर्गामुळे रात्रीच्या वेळी घाम जास्त येण्याची शक्यता वाढते, असं मानलं जातं.
डायबेटिस रुग्णांमध्ये रक्तातील साखर अचानक घटल्यास रात्री अचानक जास्त घाम येण्याची समस्या उद्भवू शकते.
लिम्फोमा सारख्या गंभीर आजारांमध्ये रात्री वारंवार घाम येणे ही एक गंभीर लक्षणांची पूर्वचिन्ह असू शकते.
अँटी-डिप्रेसंट्स, हार्मोनल औषधे किंवा डायबिटीजसाठी घेतल्या जाणाऱ्या काही गोळ्यांमुळे रात्री अधिक घाम येऊ शकतो.
झोपताना मानसिक तणाव आणि चिंता मुळे मेंदू अतीसक्रिय होतो, त्यामुळे शरीरातून अधिक प्रमाणात घाम येतो.