सतत गोड खावसं वाटतंय? मग जाणून घ्या दिवसातील कोणत्या वेळी गोड खाल्लं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

गोड

गोड खाल्ल्यानंतर अनेक वेळा लोकांना पश्चाताप होतो की त्यांचं वजन वाढेल. अनेकदा लोक गोंधळात असतात की गोड खाण्याचा योग्य वेळ कोणती असते.

वेळ

आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या वेळी गोड खाल्लं पाहिजे आणि कोणत्या वेळी टाळावं.

प्रमाणात खाणं

पण हे लक्षात ठेवा की गोडाचं सेवन मर्यादित प्रमाणातच केलं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त गोड खाल्ल्यास टाईप 2 डायबेटीस आणि लठ्ठपणाची समस्या होऊ शकते.

उपाशीपोटी खाऊ नयेत

साखर किंवा गोड पदार्थ कधीही उपाशीपोटी खाऊ नयेत, कारण त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढतो आणि लगेच एनर्जी कमी होते. गोड पदार्थ नेहमी एक संतुलित जेवण झाल्यानंतरच खावेत.

कधी खावं

गोड खाणं लंचनंतर किंवा मूड खराब असताना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामुळे तुम्ही अ‍ॅक्टिव्ह वाटता आणि त्या वेळी शरीर साखर चांगल्या पद्धतीने प्रोसेस करतं.

वर्कआउट

वर्कआउट करण्यापूर्वी गोड खाणं फायद्याचं ठरतं कारण त्यामुळे इंस्टंट एनर्जी मिळते.

झोपण्यापूर्वी खाऊ नये

गोड कधीही रात्री झोपण्याआधी खाऊ नये. त्या वेळी मेटाबॉलिझम खूपच स्लो असतो. अशा वेळी गोड खाल्ल्यास झोपेत अडथळा येतो आणि वजनही वाढतं.

हाय फायबर

गोड पदार्थ नेहमी हाय फायबर किंवा हाय प्रोटीनयुक्त अन्नासोबतच खावेत, जेणेकरून एनर्जी अचानक कमी होणार नाही.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा