Kidney health: विकेंडला तुम्हालाही या 6 सवयी आहेत का? वाढतोय किडनी फेल होण्याचा धोका

Surabhi Jayashree Jagdish

दिवसभर पुरेसं पाणी न पिणं

वीकेंडला प्रवास, बाहेर फिरणं किंवा मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवताना पाणी पिण्याकडे सहज दुर्लक्ष होतं. अशा परिस्थितीत काही लोकांमध्ये किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.

Habits that harm kidneys | saam tv

लघवी दाबून ठेवणं

लांबचा प्रवास, शॉपिंग, सिनेमा किंवा तासन्‌तास गेमिंग करताना टॉयलेटला जाता येत नाही. अधूनमधून लघवी थोड्या वेळासाठी रोखून धरणं सहसा मोठी समस्या ठरत नाही, मात्र वारंवार आणि बराच वेळ लघवी दाबून ठेवण्याची सवय टाळणं योग्य नाही.

Healthy kidneys | saam tv

मीठाचं प्रमाण

रेस्टॉरंटमधील पदार्थ, इन्स्टंट नूडल्स, पिझ्झा, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स यामुळे दोन दिवसांत सोडियमचं सेवन सहज वाढू शकतं. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो आणि शरीरातील द्रव व इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखण्यासाठी किडनीवर अधिक काम पडतं.

Dehydration and kidney health | saam tv

स्वतःहून पेनकिलर घेणं

जिम, ट्रेकिंग किंवा खेळानंतर अंगदुखी झाली की काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेतात. आयबुप्रोफेन आणि डायक्लोफेनाकसारखी NSAID औषधे किडनीमध्ये जाणारा रक्तप्रवाह कमी करू शकतात. त्यामुळे तुमच्या किडनीवर परिणाम होतो.

Kidney stone prevention | saam tv

शुक्रवार-शनिवार रात्री उशिरापर्यंत जागणं

वीकेंडला रात्री उशिरापर्यंत जागून दुपारपर्यंत झोपण्याची सवय अनेकांना असते. मात्र आठवड्याच्या दिवसांपेक्षा वीकेंडला झोपेची वेळ मोठ्या प्रमाणात बदलणाऱ्या या पॅटर्नला ‘सोशल जेट लॅग’ असं म्हटलं जातं.

Drinking less water | saam tv

वीकेंडला फास्ट फूडचा अतिरेक

वीकेंडला वारंवार रेस्टॉरंटचं जेवण, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स खाण्याची सवय लागल्यास कॅलरी, सोडियम आणि अनहेल्दी चरबीचं सेवन वाढू शकतं. यामुळे वजन वाढणं, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

Water intake for kidney health | saam tv

रोज किडनीची काळजी घ्या

किडनीच्या आजारांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर स्पष्ट लक्षणं दिसतीलच असं नाही, त्यामुळे फक्त त्रास जाणवतोय की नाही यावर किडनीचं आरोग्य ठरवता येत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या आजाराचा धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासण्या करून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

Ibuprofen kidney risk | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion | saam tv
येथे क्लिक करा