ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा रात्री अचानक पायात गोळे येतात ज्यामुळे तिव्र वेदना होतात. हायपोथॉयराईड हा आजार असलेल्या रुग्णांना वारंवार पायात गोळे येण्याचा त्रास होतो.
झोपेतच नाहीतर चालताना, व्यायाम करताना अशा कोणत्याही वेळी पायात गोळे येऊ शकतात.
पायामधील स्नायूंमध्ये इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी वाढल्यामुळे पायाना गोळा येण्याची शक्यता मानली जाते.
शरीरातील व्हिटॅमिनची मात्रा कमी झल्यास पायात गोळा येण्याची समस्या वाढते.
पायाच्या एखाद्या स्नायूवर भार पडल्यास त्याचं रूपांतर गोळ्यामध्ये होतं असं संशोधक आंदाज लावतात.
शेवगाच्या शेंगाची भाजी, कोबी, उरडलेल्या आंड्याचं पांढरा भाग असे कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास पायात गोळा येणाऱ्या त्रासापासून दूर रहाल.
संत्र्याचा रस, केळी हे पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रोत मानले जातात. त्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी नियंत्रीत रहातं.
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्यास पायात गोळा येण्याची समस्या होते. त्यामुळे पाण्याचं सेवन नियंत्रीत ठेवा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.