Dhanshri Shintre
व्हिटॅमिन सी, बी६ आणि फायबरने भरपूर असलेले हे मिश्रण पचनसंस्थेला सुधारते, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीपासून आराम देते.
या मिश्रणातील ट्रायप्टोफॅन आणि कार्बोहायड्रेट्स मेलाटोनिन पातळीवर चांगला प्रभाव टाकतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते.
केळी आणि दुधाचे नियमित सेवन व्हिटॅमिन सीची मात्रा वाढवते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
केळी आणि दूधाचे मिश्रण वजन वाढवू शकते, परंतु जास्त वजन असलेल्यांनी ते टाळावे. वजन नियंत्रणासाठी व्यायाम देखील आवश्यक आहे.
केळ्यात पोटॅशियम आणि दूधात कॅल्शियम असतो, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दूधातील कॅल्शियम आणि केळ्यातील व्हिटॅमिन D हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत.
या दोन्ही पदार्थांमध्ये आवश्यक पोषणतत्त्वे आणि ऊर्जा असते, त्यामुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.