डास फक्त घरात नाही तर घराच्या आसपासही येणार नाहीत, करा 'हे' उपाय

Dhanshri Shintre

घराभोवती स्वच्छता ठेवा

घराभोवती स्वच्छता ठेवा, पाणी साचू देऊ नका. कूलर, बादल्या, कुंड्यांमधील पाणी रोज बदला यामुळे डासांची समस्या टळेल.

नारळाचे तेल लावा

कडुलिंबाचे तेल आणि नारळाचे तेल एकत्र मिसळून शरीरावर लावा, हे नैसर्गिकरित्या डासांपासून संरक्षण देते.

तुळशी लावा

तुळशीच्या सुगंधाने डास दूर राहतात, त्यामुळे ती खिडकीत किंवा अंगणात लावा आणि डासांची समस्या टाळता येऊ शकते.

खोलीत कापूर जाळा

खोलीत कापूर जाळा, त्याच्या धुरामुळे डास दूर पळतात आणि वातावरण शुद्ध राहते.

घरात फवारणी करा

सिट्रोनेला, लैव्हेंडर किंवा युकलिप्टस तेल पाण्यात मिसळून घरात फवारणी करा, यामुळे डास दूर राहतात आणि हवा ताजीतवानी होते.

मॉस्किटो मशीन वापरा

डास दूर ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक रिपेलंट वापरा, जसे की मॉस्किटो मशीन, इलेक्ट्रिक रॅकेट किंवा व्हेपोरायझर, घर सुरक्षित आणि आरामदायक राहील.

मच्छरदाणी वापरा

रात्री झोपताना डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी वापरा, त्यामुळे शांत झोप मिळेल आणि डासांमुळे होणारे आजार टळतील.

खिडक्यांना जाळी बसवा

डास घरात येऊ नयेत म्हणून खिडक्या आणि दरवाजांना संरक्षणात्मक जाळी बसवा, यामुळे घर सुरक्षित आणि डासमुक्त राहील.

धूप किंवा लोबान जाळा

घरात धूप किंवा लोबान जाळा, त्याच्या सुगंधाने वातावरण शुद्ध होते आणि डास दूर राहण्यास मदत होते.

NEXT: रिकाम्या पोटी प्या तुळशीच्या पानांचे पाणी, होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा