ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मामध्ये श्रावणाला पवित्र महिना मानलं आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.
श्रावणात महादेवाची आणि माता लक्षमीची पूजा केली जाते. अनेकजण श्रावणातील सोमवारी व्रत ठेवतात.
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केल्यामुळे त्यांची तुमच्यावर कृपादृष्टी रहाते.
श्रावण महिन्यात काही विशेष गोष्टी केल्यास तुमच्या कामामध्ये प्रगती होईल.
श्रावण महिन्यातील एखाद्या सोमवारी तुम्ही रूद्राभिशेक करा यामुळे तुमच्या कामामधील अडथळे दूर होतात.
श्रावण महिन्यातील सोमवारी तुम्ही १०८ बेलपत्राच्या पानांवर राम नाव लिहून ते पानं महादेवाला अर्पण करा.
श्रावण महिन्यातील सोमवारी दान धर्म केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.