Surabhi Jayashree Jagdish
स्वच्छतेसाठी प्रत्येक घरामध्ये झाडूचा वापर केला जातो. असं मानलं जातं की, झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
वास्तुशास्त्र तज्ञांचं म्हणणं आहे की, झाडूचा अपमान केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात आणि अशा लोकांच्या घरी देवीचा वास कधीच राहत नाही.
जर झाडू जुनी झाली असेल, तर ती बदलणे किंवा नवीन झाडू घरी आणण्यास काही विशेष नियम असतात. चला, हे नियम जाणून घेऊया.
झाडू कोणत्याही दिवशी बदलू नये. झाडू बदलण्यासाठी शनिवार आणि मंगळवारचा दिवस अशुभ मानला जातो. गुरुवार आणि शुक्रवारला झाडू बदलणे शुभ मानले जाते.
सामान्यतः लोक जुनी झाडू तुटल्यानंतर ती घराबाहेर फेकून देतात, असं करणं योग्य नाही. असं मानलं जातं की, झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तो तिचा अपमान आहे.
जेव्हा तुम्ही झाडू बदलता किंवा नवीन झाडू घरी आणता, तेव्हा जुनी झाडू एखाद्या झाडाखाली ठेवावी आणि हात जोडून परत घरी यावं.
नवीन झाडू वापरण्यापूर्वी तिच्यावर थोडेसे मीठ शिंपडावं. मिठात शुद्धीकरणाची क्षमता असते आणि ते नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते.
झाडू कधीही उभी ठेवू नये. रात्रीच्या वेळी झाडूचा वापर करू नये. यामुळे घराची भरभराट कमी होते.