Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेक लोकांना छोटी-छोटी कामं विसरण्याची समस्या वाढली आहे. खोलीत जाऊन आपण का आलो हे आठवत नाही, ओळखीचं नाव क्षणात विसरतो, तर कधी एखादा सोपा शब्दही जिभेवर येऊनही आठवत नाही.
वरील कारणांना वय किंवा ताण कारणीभूत मानलं जातं. पण तज्ज्ञांच्या मते मेंदूही शरीरातील इतर स्नायूप्रमाणे असतो. त्याचा योग्य वापर केला तर स्मरणशक्ती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होऊ शकते. म्हणूनच मेंदू फास्ट, शार्प आणि एक्टिव ठेवण्यासाठी आज जाणून घ्या या प्रभावी सवयी.
नवी भाषा, म्युझिक इंस्ट्रुमेंट, डान्स फॉर्म किंवा कोडिंग नवी स्किल शिकल्याने मेंदूमध्ये नवे न्यूरल कनेक्शन तयार होतात. यामुळे लाँग-टर्म मेमरी मजबुत होते.
क्रॉसवर्ड, सुडोकू, वर्ड गेम किंवा लॉजिक पझल सोडवल्याने मेंदू हलक्या दडपणाखाली काम शिकतो आणि माहिती आठवण्याची क्षमता वाढते.
फास्ट वॉकिंग, सायकलिंग किंवा एरोबिक्समुळे मेंदूपर्यंत रक्तप्रवाह वाढतो. हिप्पोकॅम्पस मजबूत होतो, जो स्मरणशक्तीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
शॉपिंग लिस्ट किंवा टु-डू लिस्ट मनात पाठ करा आणि मग ती आठवून बघा. ही सवय वर्किंग मेमरी आणि लक्ष दोन्ही सुधारते.
कोणाला भेटल्यावर त्यांचं नाव पुन्हा म्हणा, एक साधा प्रश्न विचारा आणि त्यांच्या चेहऱ्याच्या विशेष गोष्टीशी नाव जोडून मनात इमेज तयार करा.
उजव्या हातांनी काम करणाऱ्यांनी डाव्या हाताने ब्रश करणं, कप हलवणं किंवा संगणकाचा माउस चालवणं यामुळे मेंदूचे कमी वापरले जाणारे भाग सक्रिय होतात व cognitive flexibility वाढते.