Sakshi Sunil Jadhav
आपण एखाद्या मॉल किंवा मोठ्या दुकानातून एखादी वस्तू घेतो. तेव्हा आपल्याला बिल देण्यात येतं.
दिलेलं बिल प्रत्येकजण कसलाही विचार न करता हातात घेऊन पर्समध्ये ठेवतात.
तुम्हाला माहितीये का? बिलाला हात लावल्याने कॅन्सर आणि अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
कागदाचं बिल हे थर्मल पेपर पासून तयार होतं. ज्यामध्ये बीपीए आणि बीपीएस असते.
बीपीए हे एक एंडोक्राइन डिसरप्टर असते. त्याने शरीराच्या हार्मान सिस्टिमवर थेट परिणाम होतो.
बीपीएच्या संपर्कात आल्याने महिलांना पीसीओडी, मुल न होणे, किंवा स्तनाचा कॅन्सर अशा गंभीर समस्या उद्भवतात.
तसेच पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. थायरॉइडच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
मुलांना एडीएचडी (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) आणि इतर न्युरोलॉजिकल समस्या होऊ शकतात.
ज्या महिला गर्भवती असतात त्यांच्या गर्भाशयातील बाळावर परिणाम होतो. पावतीला हाताने स्पर्श करू नका. तसेच ओल्या हाताने स्पर्श करणं टाळा.