Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Surabhi Jayashree Jagdish

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मृत्यू वाढले

1990 मध्ये भारतात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे सुमारे 2 लाख 17 हजार 700 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये हा आकडा वाढून सुमारे 3 लाख 25 हजार 600 झाला. म्हणजेच 1990 च्या तुलनेत मृत्यूंची संख्या जवळपास 50 टक्क्यांनी वाढली.

Smoking health risks | saam tv

धुराच्या संपर्कात येणारे लोक वाढले

1990 मध्ये भारतातील सुमारे 37 कोटी 50 लाख लोक दुसऱ्याच्या तंबाखूच्या धुराच्या संपर्कात होते. 2023 मध्ये ही संख्या वाढून सुमारे 44 कोटी 40 लाख झाली. म्हणजेच अशा लोकांची संख्या सुमारे 18 टक्क्यांनी वाढली.

Smoking health risks | saam tv

Age-standardised prevalence म्हणजे काय?

Age-standardised prevalence म्हणजे वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांची संख्या लक्षात घेऊन काढलेलं प्रमाण. यामुळे वेगवेगळ्या वर्षांची आकडेवारी योग्य पद्धतीने तुलना करता येते. भारतात हे प्रमाण 1990 मध्ये 43.2 टक्के होते, तर 2023 मध्ये ते कमी होऊन 30.6 टक्के झाले.

Secondhand tobacco smoke | saam tv

204 देशांचा अभ्यास

जगभरातील संशोधकांनी 204 देश आणि प्रदेशांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंगचा अभ्यास केला. 2023 मध्ये जगभरातील सुमारे 2.71 अब्ज लोक दुसऱ्याच्या तंबाखूच्या धुराच्या संपर्कात होते. यामध्ये 0 ते 14 वर्षे वयोगटातील सुमारे 76 कोटी 70 लाख मुलांचा समावेश होता.

Passive smoking statistics India | saam tv

भारत, चीन आणि इंडोनेशियात मोठी संख्या

2023 मध्ये चीन, भारत आणि इंडोनेशिया या तीन देशांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंगच्या संपर्कात असलेल्या लोकांची संख्या खूप मोठी होती. चीनमध्ये सुमारे 66 कोटी 40 लाख, भारतात 44 कोटी 40 लाख आणि इंडोनेशियात 14 कोटी 20 लाख लोक धुराच्या संपर्कात होते. या तीन देशांमध्ये जगातील अशा लोकांपैकी जवळपास निम्मे लोक होते.

Passive smoking 1990 | saam tv

महिलांचा धुराशी जास्त संपर्क

दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि ओशिनिया या भागांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंगचं प्रमाण जास्त होतं. या भागांमध्ये वयानुसार काढलेलं प्रमाण 48.4 टक्के होते. काही देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा तंबाखूच्या धुराशी होणारा संपर्क जवळपास 1.8 पट जास्त होता.

Passive smoking and heart disease | saam tv

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे आरोग्यावर परिणाम

दुसऱ्याच्या तंबाखूच्या धुरामुळे हृदय आणि श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा धूर अधिक धोकादायक ठरू शकतो. लहान मुलांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. कारण त्यांची फुफ्फुसं अजून पूर्णपणे विकसित झालेली नसतात.

Secondhand smoke and children | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा