Tonsil Care: टॉन्सिलच्या त्रासात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, होईल मोठा धोका

Dhanshri Shintre

टॉन्सिलची समस्या

टॉन्सिलची समस्या वाढू नये यासाठी आहारात काही बदल आवश्यक आहेत. या ७ गोष्टी टाळा आणि टॉन्सिलचा त्रास कमी करा.

मसालेदार अन्न

तिखट आणि मसालेदार अन्न टॉन्सिलच्या त्रासात वाढ करू शकते. अशा अन्नामुळे घशात जळजळ, वेदना आणि सूज होण्याची शक्यता असते.

लिंबूवर्गीय फळे

टॉन्सिलच्या त्रासात लिंबूवर्गीय फळे टाळावीत, कारण त्यातील आम्लामुळे घशात जळजळ होऊन टॉन्सिल्सची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

कॅफिन

टॉन्सिल्स असताना कॅफिनयुक्त पेये जसे की चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स टाळावेत, कारण हे शरीर डिहायड्रेट करून घशाची स्थिती अधिक बिघडवतात.

अल्कोहोलचे अधिक सेवन

अल्कोहोलचे अधिक सेवन टॉन्सिल्सच्या समस्यांना वाढवते. यामुळे घशात तीव्र जळजळ होते आणि टॉन्सिल्समध्ये सूज निर्माण होण्याची शक्यता वाढते.

तळलेले पदार्थ

टॉन्सिल्सचा त्रास असल्यास तळलेले पदार्थ टाळा, कारण त्यातील तेल घशाला त्रास देऊन सूज वाढवू शकते.

शिळे अन्न

शिळे अन्न खाल्ल्याने टॉन्सिल्सचा त्रास वाढू शकतो, कारण त्यात बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता अधिक असते.

NEXT: किडनी स्टोनसाठी रामबाण उपाय! 'या' धान्याचे पाणी ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

येथे क्लिक करा