Fruit Chaat : उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाताय? वेळीच व्हा सावध नाहीतर...

Shreya Maskar

फळांची साले काढणे

फळांची सालं काढल्याने संसर्गाचा धोका वाढतो. फळांची साल काढून फळे बाजूला खूप वेळासाठी ठेवली तर ती खराब होतात. सालीमुळे फळे सुरक्षित राहतात. साल फळाला खराब होण्यापासून वाचवते.

Fruit Chaat | yandex

प्रदूषण

रस्त्यावर फ्रुट चाटच्या गाडी पाहायला मिळतात. फळे खाण्या आरोग्याला फायदेशीर असे म्हणून आपण हे फ्रुट चाट खातो मात्र ते आरोग्यास घातक ठरते.

Pollution | yandex

कापलेली फळे

फ्रुट चाटच्या गाडीवरील फळे आधीच कापून ठेवलेली असतात. ती तशीच उघडी राहतात. त्यामुळे फळांचा आतील भाग हवा, धूळ, प्रदूषण आणि अस्वच्छ हातांच्या संपर्कात येतो. कापलेली फळे जास्त काळ बाहेर ठेवली, विशेषतः उष्ण हवामानात तर जिवाणू आणि बुरशीमुळे खराब होतात.

Cut Fruits | yandex

विषबाधा

कापलेली फळे योग्य तापमानात साठवली नाहीत, तर ती तुम्हाला गंभीर नुकसान पोहचवतात. यामुळे पोटाचे विकार आणि विषबाधा होते. पोटदुखी, उलट्या आणि जुलाब, ताप या समस्या उद्भवतात.

Food Poisoning | yandex

पोषक तत्त्वे नष्ट

तज्ज्ञांच्या मते फळे कापून आणि जास्त काळ साठवून ठेवल्याने त्यातील आवश्यक पोषक तत्त्वे नष्ट होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांनी हे खाणे टाळा.

Fruit Chaat | yandex

स्टोर करा

कापलेली फळे शिल्लक राहिल्यास, ती एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. रस्त्याच्याकडेला उघडपणे विकली जाणारी कापलेली फळे खाणे पूर्णपणे टाळा.

Fruit Chaat | yandex

एक्सपायरी डेट

सुपरमार्केटमध्ये बॉक्समध्ये पॅक केलेली कापलेली फळे मोकळ्या फळांपेक्षा थोडी अधिक सुरक्षित मानली जाऊ शकतात. तरीही ती खरेदी करताना फळांची एक्सपायरी डेट तपासा.

Fruit Chaat | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Fruit | Saam Tv

NEXT : घरीच बनवा विकतसारखे घट्ट मलईदार दही, विरजण लावताना टाळा 'ही' एक चूक

Curd Making | saam tv
येथे क्लिक करा...