Shreya Maskar
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दही कधीही मातीच्या भांड्यात लावावे. मातीच्या भांड्यात बनवलेले दही प्रथिने, पोषक घटकांनी समृद्ध असते. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक पोषक तत्वे असल्यामुळे ते अधिक फायदेशीर ठरते.
मातीच्या भांड्यात बनवलेले दही विशेषत तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुमची हाडे मजबूत राहतात.
मातीच्या भांड्यात बनवलेल्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण अधिक असते. मातीची भांडी चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीसाठी चांगले वातावरण तयार करतात.
मातीच्या भांड्यांमधील दही खाल्ल्याने आरोग्याला कोणतीही समस्या होत नाही. हे दही पचायला हलके असते. ॲसिडीटीचा त्रास होत नाही. पचनक्रिया सुधारते.
मातीच्या भांड्यांमध्ये उष्णता टिकवून ठेवण्याचा उत्तम गुणधर्म असतो. यामुळे दही चांगले घट्ट होते.परिणामी त्याचा पोत आणि चव अधिक चांगली राहते.
मातीच्या भांड्यात बनवलेले दही अधिक मलईदार आणि घट्ट असते. मातीच्या भांड्यांमध्ये लहान छिद्रे असतात, जी अतिरिक्त पाणी शोषून घेतात.
मातीच्या भांड्यात साठवलेले दही अधिकच चविष्ट लागते. याचे कारण असे की, मातीमुळे दह्याला एक हलका सुगंध येतो, ज्यामुळे त्याची चव वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.