Siddhi Hande
हिंदू धर्मानुसार, कोणतीही गोष्ट किंवा काम करण्यासाठी एक विशेष नियम तयार केले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला यश मिळेल.
नखं कापण्यासाठीही एक विशिष्ट वेळ असते. त्याच वेळेत तुम्ही हे काम करायचे असते.
मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित असतो. या दिवशी नखे कापू नयेत. अन्यथा तुमच्या आयुष्यात संकंट येऊ शकते.
गुरुवारी केस कापू नयेत. अन्यथा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती कमजोर होऊ शकते.
शनिवारी नख आणि केस दोन्ही कापू नयेत.अन्यथा शनिदेव नाराज होतील. त्यामुळे अडचणी येऊ शकतात.
रविवार हा वार सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी सुर्यदेवाची पूजा करावी. या दिवशी नखे आणि केस कापले जात नाही.
तुम्ही बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी नखे कापू शकतात. या दिवशी नखं कापल्यावर घरात सुख-समृद्धी येईल.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.