Kitchen Tips: लोखंडाच्या कढईत या भाज्या चुकूनही करू नका, भाजी होईल खराब

Surabhi Jayashree Jagdish

लोखंडी कढई

थंडीत लोखंडी कढईचा वापर चांगला असला तरी काही भाज्या यात बनवल्या तर चवीत बदल, धातूची चव किंवा पोषणात घट होऊ शकते. लोखंडी कढई गरम ठेवते, त्यामुळे काही नाजूक भाज्यांचा रंग, चव आणि टेक्स्चर लगेच खराब होऊ शकतो.

टोमॅटोची भाजी

टोमॅटो आंबट असल्याने लोखंडी कढईशी लगेच प्रतिक्रिया होते. त्यामुळे भाजी काळसर पडते आणि थोडी धातूसारखी चव येऊ शकते.

आंबट रस्सा भाजी

चिंच, कोकम यांसारख्या आंबट पदार्थांमुळे लोखंडाचा अंश अन्नात मिसळू शकतो. त्यामुळे रस्सा काळसर आणि जड वाटतो.

दुधी भोपळा

दुधी भोपळा सौम्य असल्याने लोखंडी कढईच्या अतिरिक्त उष्णतेने पटकन चिटकतो. यामुळे टेक्स्चर मऊ होऊन पेस्टसारखा होतो. चवीतही फरक पडतो.

मेथीची भाजी

मेथी आंबटपणा धरून ठेवत असल्याने लोखंडाशी प्रतिक्रिया होते. त्यामुळे भाजीचा रंग काळा होऊ शकतो. धातूची चवही काही वेळा जाणवते.

वांगी

वांगी लोखंडाशी लवकर रिएक्शन देतं आणि ती लगेच काळी पडतात. त्याचं टेक्स्चर बिघडतं आणि रंग काळा होतो. चवही कडवट होऊ शकते.

पालेभाज्या

काही भाज्यांमध्ये आयरन आणि ऑक्सलेट्स जास्त असतात, त्यामुळे लोखंडी कढईत शिजवल्यावर काळसरपणा येतो. चव थोडी बिघडू शकते.

Gorai Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचंय? लांब नाहीच बोरीवलीच्या गोराईमध्ये असलेल्या या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा