ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण परफ्यूमचा वापर करतात. यामुळे दिवसभरातील घामाचा वास येत नाही आणि ताजे वाटते.
योग्य ठिकाणी परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो, परंतु काही भागांवर तो वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
चेहरा किंवा डोळ्यांच्याभोवती परफ्यूम लावू नका, यामुळे जळजळ, अॅलर्जी किंवा रॅशेस होऊ शकतात.
जखम झालेल्या ठिकाणी परफ्यूम लावू नका, यामध्ये असलेले केमिकल्स जळजळ आणि सूज वाढवू शकतात.
अंडरआर्मची त्वचा खूप सेसेंटिव्ह असते,म्हणून येथे परफ्यूम लावल्याने खाज येणे किंवा इन्फेक्शन होऊ शकते.
प्रायव्हेट पार्टवर परफ्यूम लावल्याने इन्फेक्शन किंवा त्वचेशी संबधित समस्या होण्याचा धोका वाढतो.
मनगट, मानेच्या मागच्या बाजूला किंवा कानाजवळ परफ्यूम लावल्याने त्याचा सुंगध जास्त वेळ टिकतो. आणि आरोग्यावरही परिणाम होत नाही.