Cooking tips no Black Paper: 'या' भाज्यांमध्ये चुकूनही वापरू नका काळीमिरी

Surabhi Jayashree Jagdish

काळमिरी

काळीमिरी हा एक असा मसाला आहे, जो जेवणाला तिखटपणा आणि एक विशिष्ट सुगंध देतो.

काही भाज्यांमध्ये टाळा

काही भाज्या आणि पदार्थांमध्ये काळीमिरीचा वापर केल्यास त्यांची मूळ चव बिघडू शकते किंवा ती चव अनावश्यक वाटू शकते.

पालकाची भाजी

पालक पनीर किंवा पालकाच्या साध्या भाजीत काळीमिरीचा वापर केल्यास पालकाची नैसर्गिक चव हरवते.

मेथीची भाजी

मेथीचा स्वतःचा एक खास कडूपणा असतो. काळीमिरीने तो बिघडू शकतो.

शाही पनीर

ही भाजी मलई, काजू पेस्ट आणि टोमॅटो वापरून बनवली जाते. त्यात काळीमिरी वापरल्यास भाजीचा क्रीमी स्वाद आणि रंग दोन्ही बिघडू शकतो.

पनीर बटर मसाला

या भाजीचा मूळ स्वाद बटर आणि टोमॅटोवर आधारित असतो. काळीमिरी वापरल्यास तो स्वाद बदलू शकतो.

भोपळ्याची भाजी

लाल भोपळा किंवा इतर भोपळ्याची भाजी सहसा गोडसर असते. त्यात काळीमिरी वापरल्यास चव विचित्र होऊ शकते.

  1. स्वयंपाकात काळी मिरीचा वापर

Cooking Tips: स्वयंपाकघरात कोणत्या भाज्यांमध्ये लसूण चुकूनही घालू नये?

garlic | saam tv
येथे क्लिक करा