Surabhi Jayashree Jagdish
नाचणीची भाकरी ही पौष्टिक असली तरी ती लाटताना कडा फुटणं ही अनेकांची सामान्य तक्रार असते. नाचणीमध्ये ग्लूटेन नसल्यामुळे पीठ लवकर तुटतं आणि भाकरी नीट आकारात येत नाही.
मात्र योग्य पद्धत, पाण्याचं प्रमाण घेतलं तर तर भाकरी सुंदर, मऊ होते. लाटताना भाकरी तुटू नये म्हणून काय केलं पाहिजे ते पाहूयात
नाचणीचे पीठ नेहमी कोमट किंवा गरम पाण्यात भिजवावं. थंड पाणी वापरल्यास पीठ नीट बांधलं जात नाही. कोमट पाण्यामुळे पीठ मऊ होते आणि कडा फुटत नाहीत.
पीठ मळताना ते किंचित ओलसर असणं आवश्यक आहे. कोरडे पीठ लाटताना लगेच कडा तुटतात. गरज भासल्यास थोडे थोडे पाणी वाढवत जा.
मळलेले पीठ किमान ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पीठ पाणी नीट शोषून घेते. भाकरी लाटताना पीठ लवचिक राहते.
नाचणीची भाकरी पोळपाटावर न लाटता हाताने थापावी. बोटांनी हळूच दाब देत गोल आकार द्यावा. यामुळे ती फुटत नाही.
लाटताना कडा फुटत असतील तर बोटाला पाणी लावा. त्या पाण्याने कडा हलक्या हाताने जोडून घ्या. ही पद्धत भाकरी तुटण्यापासून वाचवते.
नाचणीच्या भाकरीत भाताचं पीठ मिसळल्यास कडा तुटतात. नाचणीचं पीठ वापरणे अधिक योग्य ठरते. भाकरीची पकड आणि मऊपणा टिकून राहतो.