Surabhi Jayashree Jagdish
आपल्यामध्ये असलेल्या क्रीडा शक्तीला आज ताजेतवानेपण मिळेल. शेअर्स मधील गुंतवणूक फायदेशीर राहणार आहे. आज दिपावलीचा पहिला दिवस धनदायक जाणार हे नक्की.
रमा एकादशी आणि वसुबारस अशा दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मनामध्ये असणाऱ्या सर्व कामना पूर्ण होणार आहेत.
भावंड सौख्य ओसंडून मिळणार आहे. जवळच्या प्रवासातून फायदा होईल. दिवस चांगला आहे.
धन योगाला दिवस चांगला आहे. पैशाची आवक जावक उत्तम राहणार आहे. दिवाळीची सुरुवात धनालाभ दणक्यात होणार आहेत.
मानसिकता उत्तम राहील. एखादा महत्त्वाचा सन्मान आपल्या शिरावर तुरा असल्यासारखा आज मिळेल. दिवाळी सुखदायी जाणार अशी खात्री होईल.
आकारण मनस्ताप वाट्याला येतील. खर्चाला धरबंध राहणार नाही. मात्र हिशोब लागला नाही तर बेचैन वाटेल.
परदेशाशी निगडित व्यवहार, वार्तालाप,मैत्री बंध, प्रदर्शने यामध्ये आपले पाय घट्ट रोवले जातील. दिवाळी क्षणाच्या ऐन तोंडावर व्यवसायाशी निगडित नवीन कामे मिळतील.
योजलेल्या गोष्टी नियोजन केलेल्या गोष्टी त्याच मार्गाने होतील. सणाच्या गोष्टीचा आनंद द्विगुणीत होईल. नोकरी व्यवसायामध्ये बढतीचे योग आहेत.
दत्तगुरूंची उपासना फलदायी ठरणार आहे. सणाचा आनंद वाढणार कारण अशी सुवार्ता आपल्या कानी येतील. प्रेमामध्ये मात्र व्यत्यय,अडकाठी येण्याचा संभव आहे. कर्मफल भाग्यकारक ठरेल.
दिवसाचं वेगळेपण असे काही म्हणण्यापेक्षा सण असलं तरी काबाडकष्ट चुकणार नाहीत असा दिवस आहे. मात्र अचानक धनलाभ होतील त्या दृष्टीने सकारात्मक रहा.
जोडीदाराचे म्हणणे ऐकून कार्य करावे लागेल. महत्त्वाची कामे अनेक दिवस राहिलेली सुरळीत होतील. दिवाळीचा आनंद जोडीदाराबरोबर द्विगुणीत होईल.
नको इतके कष्ट आणि मेहनत आज नको. तब्येतीच्या तक्रारी सुध्दा होतील. मानसिकता सांभाळून पुढे जावे.