Shreya Maskar
दिवाळी म्हटलं की फराळ, मिठाई, चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि वेगवेगळ्या पदार्थ आलेच. दिवाळीत या पदार्थांवर ताव मारला जातो.
तेलकट-गोड खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि या काळात व्यायामाकडे दुर्लक्ष होते, असे होऊ नये म्हणून ५ गोष्टी फॉलो करा. तुम्ही फराळ करूनही हेल्दी राहून शकता.
दिवाळीत फराळाचा खाण्याचा मोह आवरणे कठीण असते. मात्र, एकाच वेळी भरपूर फराळ खाण्याऐवजी थोड्या प्रमाणात खा. वारंवार खाण्याची सवय टाळा. कॅलरीज कंट्रोलमध्ये राहतील.
लाडू, पेढे, बर्फी आणि इतर मिठाईंमध्ये साखर, चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गोड पदार्थ खाताना त्याचे प्रमाण निश्चित करा.
सणाच्या गडबडीत व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. जेवणानंतर १० मिनिटे हलके चालल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यासही मदत होऊ शकते.
दिवाळीच्या गडबडीत हेल्दी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. तहान लागल्यावर पाणी प्या आणि दिवसभर नियमितपणे पाणी घेत राहा. गोड शीतपेये, पॅकबंद ज्यूस आणि जास्त साखर असलेली पेये याऐवजी साधे पाणी निवडा.
शक्य असल्यास फराळ घरी बनवा. त्यात तेल, तूप, साखर यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. जर तुम्ही फराळ विकतचा घेऊन येत असाल तर चांगल्या दुकानाची निवड करा. घरगुती फराळ देखील एक चांगला पर्याय आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.