Siddhi Hande
दिवाळीसाठी शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा चाळून घ्यावा.
त्यानंतर एका भांड्यात साखर घ्यावी. त्यात दूध टाकावे. साखर विरघळेपर्यंत दूध गरम करावे.
त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करा. हे तूप मैद्यात टाका. त्यानंतर दूध आणि साखरेचे मिश्रण त्यात हळूहळू टाका.
हे मिश्रण टाकल्यानंतर त्याचा हळूहळू गोळा बनवावा. गोडा थोडासा कडक व्हायला हवा. हे मिश्रण झाकून ठेवा.
त्यानंतर हा मैदाचा गोळा छान मळून घ्यावा. त्यानंतर त्याची पोळी लाटावी. या पोळीच्या शंकरपाळ्या कापून घ्याव्यात.
तेल गरम करायला ठेवाव्यात. मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घ्यावेत.