Manasvi Choudhary
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या १८ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे.
दिवाळीत गोड पदार्थ, मिठाईचे नैवेद्य दाखवले जाते. बाजारात भेसळयुक्त मिठाईपासून बचावण्यासाठी घरीच तुम्ही या सोप्या रेसिपी ट्राय करा.
चॉकलेट पेढा बनवण्यासाठी खवा, कोको पावडर, बदाम आणि बटर यांचे मिश्रण शिजवून त्यात व्हॅनिला एसेन्स घाला आणि थंड करा चॉकलेट पेढा तयार होईल .
नारळाचे लाडू बनवण्यासाठी काजू आणि मनुके तूपात भाजून बारीक करा नंतर त्यात नारळाचा किस आणि रवा मिक्स करून दूध घाला. शिजल्यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स मिक्स करून त्याचे गोलाकार लाडू करा.
रसमलाई तयार करण्यासाठी तुम्हाला केशर दूधामध्ये ड्रायफ्रुट्स घालून तुपामध्ये उकळून घ्यावे लागेल. नंतर त्यात खवा मिक्स करून शिजवा.
गुलाब जाम बनवण्यासाठी पनीर किसून त्यात खवा, मैदा, तूप आणि साखर या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करून दूधामध्ये शिजवा. त्यात वेलची पावडर मिक्स आणि छोटे छोटे गोळे तयार करा. पॅनमध्ये गरम तेलामध्ये गुलाबजाम तळून घ्या.