Siddhi Hande
दिवाळीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. गृहिणींनी फराळ बनवायला सुरुवातदेखील केली असेल .
करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी खोबरे किसून घ्या. त्यानंतर ते खोबरं खरपूस भाजून घ्या.
खोबरं भाजून झाल्यानंतर रवा मंद आचेवर भाजून घ्या.
यानंतर कढईत तूप टाकून त्यात सुका मेवा भाजून घ्या.
एका मोठ्या भांड्यात पीठी साखर, वेलची पावडर आणि रवा, किसलेले खोबरे टाका.
यानंतर एका बाजूला मैदा चाळून घ्या. त्यात पाणी टाकून पीठ छान मळून घ्या.
यानंतर पीठाचे गोळे करा आणि त्याच्या बारीक पुऱ्या लाटून घ्या.
ही पुरी करंजी बनवण्याच्या साच्यात ठेवा. त्यानंतर करंजी कापून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा. त्यात करंजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.